Home अहमदनगर नगर औरंगाबाद मार्गावर ट्रकचालकास मारहाण करत लुटले  

नगर औरंगाबाद मार्गावर ट्रकचालकास मारहाण करत लुटले  

Nagar robbed a truck driver on Aurangabad road 

नेवासा | Nevasa: अहमदनगर औरंगाबाद मार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात औरंगाबाद कडे चाललेला ट्रक लुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी ट्रकचालक शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद वय २१ उत्तरप्रदेश याने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद हा दुपारी ३.३० वाजता मुंबई घेऊन ट्रकमध्ये फळ घेऊन रांची येथे चालला होता. शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नगर औरंगाबाद रस्त्यावरून औरंगाबादकडे चाललेला होता. उस्थळ दुमाला शिवारात एस्सार पेट्रोल पंपाच्या पुढे काही अंतरावर एका दुचाकीने आलेल्या तिघानी ट्रकला गाडी आडवी लावली. ट्रक चालकाने ट्रक थांबविली. दुचाकीवरील तिघांनी उतरून ट्रकच्या काचेवर दगडे मारली. ट्रकमध्ये चढून चालकाला मारहाण केली. त्याच्या खिशातील१२ हजार ५०० रुपये काढून घेण्यात आले असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Nagar robbed a truck driver on Aurangabad road 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here