पत्नीने भावाच्या मदतीने पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून
नगर | Nagar: तालुक्यातील वाळुंज येथे घरगुती वादातून पत्नीने भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नी व तिचा भाऊ यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
संतोष दत्तू मोरे वय 42 रा. वाळुंज यास डोक्यात कुऱ्हाड घालून जीवे मारण्यात आले आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. या खून प्रकरणी पत्नी प्रियंका संतोष मोरे व तिचा भाऊ रामेश्वर यशवंत या दोघांना अटक करण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील वाळुंज फाटा येथे मोरे वस्तीवर राहणारा संतोष मोरे हा घरगुती कारणावरून पत्नी प्रियांकाला नेहमीच त्रास देत होता. त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. प्रियंकाने आपला भाऊ रामेश्वर याला घरी मोरे वस्ती येथे बोलावून घेतले. संतोष व रामेश्वर यांच्यात चांगलेच वाद झाले. रामेश्वर व प्रियंका यांनी संतोषला मारहाण केली. या मारहाणीत संतोष याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रियंका व रामेश्वर या दोघां विरोधात खुनाचा गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे.
Web Title: Nagar wife with the help of her brother stabbed the husband in the head