सामुहिक बलात्काराने खळबळ: फेसबुकवर मैत्री झाली, तरुणाने फ्लॅटवर बोलावले अन ..
नागपूर | Nagpur Crime: पीडित तरुणी ही अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. या पिडीत तरुणीची काही दिवसांपूर्वी एक मित्राशी फेसबूकवरून ओळख झाली. दोन फेब्रुवारी या दिवशी कॅम्पस चौकातून त्या मित्राने आपल्या दुचाकीवर तरुणीला बसविले. त्याने तिला जाफरनगर ले-आऊट भागातील एका फ्लटमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिला गुंगीचे औषध देऊन त्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.
काही वेळाने दुसरा त्याचा एक मित्र आला. त्यानंतर चार-पाच जण त्याठिकाणी आले. त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. यामुळे तरुणी फार घाबरली होती. त्यानंतर तरुणीला सीताबर्डी भागात सोडून दिले. दुसर्या दिवशीसुद्धा तिला जाफरनगर भागात घेऊन जाऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. आरोपींनी दारूची पार्टी करून तिच्यावर अत्याचार केले. तिच्यावर दोनदा सामूहिक अत्याचार झाल्यानंतर ती घरी गेली.
घरी गेल्यावर तिच्या पोटात दुखू लागले. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तपासाअंती तिच्यावर बळजबरी करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. पीडितेने गुरुवारी सायंकाळी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या घटनेची माहिती मिळताच डीसीपी विनिता साहू याही ठाण्यात पोहचल्या. पीडितेकडून घटनेची माहिती घेतली. तिने दिलेल्या माहितीनुसार, दोन मुले जाफरनगर तर दोन मुले बजेरिया येथील रहिवासी आहेत. गुन्हे शाखा आणि पोलिसांचा डीबी स्वॅड आरोपींच्या शोधासाठी कार्य सुरु केले आहे.
Web Title: Nagpur Crime gang rape Became friends on Facebook