Home अहमदनगर अहमदनगर: तरुणाचा इमारतीवरून खाली पडून मृत्यू

अहमदनगर: तरुणाचा इमारतीवरून खाली पडून मृत्यू

Rahuri Accident Young man dies after falling from building

Ahmednagar | Rahuri Accident | राहुरी: राहुरी शहर हद्दीत दुर्दैवी घटना घडली आहे. सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या इमारतीवरून एक तरूण खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरूणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो उपचारापूर्वीच मयत झाला. याबाबत राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजललन आदवाशी वय ४० वर्षे रा. मध्य प्रदेश असे मयत तरुणाचे नाव आहे.  हा तरूण सुमारे एक महिन्या पासून राहुरी शहरात तनपूरे काॅम्प्लेक्स येथे तिसऱ्या मजल्यावर आपल्या कुटूंबासह राहत होता. तो गवंडी मजूर म्हणून काम करून आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाह करीत असे. राहुरी शहरातील आडवी पेठ भागात तनपूरे काॅम्प्लेक्स ही सुमारे पन्नास फूट उंच इमारत आहे. राजललन आदवाशी हा तरूण दिनांक १० फेब्रुवारी रोजी त्या इमारतीच्या छतावर गेला होता. रात्री नऊ वाजे दरम्यान तो तरूण छतावरून खाली पडला. परिसरातील काही तरूणांनी त्याला ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याला उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. याबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Rahuri Accident Young man dies after falling from building

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here