Home अहमदनगर अहमदनगर: 17 वर्षीय मुलीचे राहात्या घरातून अपहरण

अहमदनगर: 17 वर्षीय मुलीचे राहात्या घरातून अपहरण

Rahuri 17-year-old girl was abducted from her residence

Ahmednagar | राहुरी | Rahuri:  राहुरी तालुक्यातील अनापवाडी येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहात्या घरातून अपहरण (abducted) करून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे, सुमारे दीड महिन्यापूर्वी ही घडली. मात्र, मुलीचा शोध घेऊनही ती सापडत नसल्याने गुरूवारी दि. 10 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील अनापवाडी येथे 17 वर्षीय मुलगी तिच्या आईवडिलांसोबत राहते. दि. 12 डिसेंबर २०२१ रोजी रात्री नऊ ते पहाटे चार वाजे दरम्यान मुलीला तिच्या राहात्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले. सकाळी उठल्यानंतर घरातील लोकांना तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

अखेर दि. 10 फेब्रुवारी रोजी त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार पोलीस अधिकार्‍यांसमक्ष सांगितला.  त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात इसमाविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील हे करीत आहेत.

Web Title: Rahuri 17-year-old girl was abducted from her residence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here