Home अहमदनगर अहमदनगर: खून करून मृतदेह रस्त्यावर फेकून देऊन ट्रकचालक स्वतःहुन पोलीस ठाण्यात

अहमदनगर: खून करून मृतदेह रस्त्यावर फेकून देऊन ट्रकचालक स्वतःहुन पोलीस ठाण्यात

Rahata truck driver murder by throwing his body on the road

Ahmednagar | राहता | Rahata:  नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर नजीक ट्रक चालवण्याच्या दोन चालकांत वाद झाले या वादातूनच एकाचा खुन (Murder)  केल्याची घटना घडली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपी रमेश राऊत स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास शिर्डी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की नगर मनमाड महामार्गावर काल शुक्रवार दि. 11 रोजी अकलूज येथून भरलेला मालट्रक क्रमांक एमपी-09 एचएच-9264 इंदोरकडे जात असताना राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाट्यानजीक चालू गाडीतून एक मृतदेह रस्त्यावर फेकून देऊन ट्रकचालक मालट्रक घेऊन थेट कोपरगाव पोलीस स्टेशनला हजर झाला. मात्र सदरील घटना शिर्डी पोलीस ठाणे क्षेत्रात घडल्याने कोपरगाव पोलिसांनी आरोपी रमेश मदन राऊत यास शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

आरोपी रमेश मदन राऊत याची शिर्डी पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत ट्रकचालक रामसिंग, रा. इंदौर, मध्यप्रदेश याचेबरोबर गाडी चालवण्यावरून वाद झाल्याने कॅबिनमधून रॉड आणि व्हिल पान्हा डोक्यात मारून त्याचा खून करुन मृतदेह नगर-मनमाड महामार्गावर सावळीविहीर नजीक फेकण्यात आले असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.

Web Title: Rahata truck driver murder by throwing his body on the road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here