Home क्राईम Rape Case: अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, मित्रच निघाला आरोपी

Rape Case: अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, मित्रच निघाला आरोपी

Nagpur gang rape Case 

नागपूर | Rape Case: रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी बसलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच तिच्यासोबत असणाऱ्या मित्रासही मारहाण करण्यात आली. गुरुवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इसासनी भागात ही घटना घडली.

पुढील महिन्यात ही तरुणी १८ वर्षाची होणार आहे. तिच्या घरची परीस्थिती नाजूक आहे. त्यामुळे ती बराच वेळ तिच्या मित्रासोबत राहते. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही मुलगी इसासनी भागात मित्रासोबत बसून असताना त्याच भागातील राहणारे तीन आरोपी तेथे आले. त्यांनी युवतीच्या मित्राला मारहाण करीत तिच्यावर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. हा सर्व प्रकार तिच्या मित्राने स्थानिक नेत्याच्या घरी जात कथन केला. एमआयडीसी पोलिसांना फोन करून माहिती दिली. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या दोघांची चौकशी केली. त्यातून पुन्हा नवीन माहिती समोर आली. पोलिसांकडे फोन करणारा युवतीचा मित्र तीन दिवसांपासून वेगवेगळ्या तरुणांकडून पैसे घेऊन तिला शरीरसंबंधासाठी त्यांच्यकडे पाठवीत होता असेही पुढे आले. त्यामुळे याप्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले.

तिची तक्रार नोंदवून पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात त्या तीन आरोपींना अटक केली तर पैशाच्या आमिषाने देह विक्री करून घेणारा तिचा मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यालाही अटक करण्यात आली आहे.   

Web Title: Nagpur gang rape Case 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here