Home अहमदनगर अहमदनगर: ईडीच्या रडारवर आणखी एक राष्ट्रवादीचा मंत्री

अहमदनगर: ईडीच्या रडारवर आणखी एक राष्ट्रवादीचा मंत्री

NCP Junior minister Prajakt Tanpure  property confiscated from ED

अहमदनगर | Ahmednagar: ईडीकडून राज्यातील मंत्र्यांवरील कारवाई सुरुच आहे. आता नगर जिल्ह्यातील एक मंत्री ईडी रडारवर आलेला आहे.  आणखी एका राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure  ) यांच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

नागपूरमधली 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. ती जमीन जप्त केली आहे. त्याशिवाय अहमदनगरमधील साडेचार एकर जमीन जप्त केली आहे. त्या जागेची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे. एकूण 13.41 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Web Ttile: NCP Junior minister Prajakt Tanpure  property confiscated from ED

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here