Home महाराष्ट्र Maratha Reservation:  मराठा समाजाच्या मागण्या मान्य, संभाजी राजेनी उपोषण घेतले मागे

Maratha Reservation:  मराठा समाजाच्या मागण्या मान्य, संभाजी राजेनी उपोषण घेतले मागे

Maratha Reservation demands of the Maratha community, Sambhaji Raje went on a fast

मुंबई | Maratha Reservation: खा. संभाजी राजे मराठा समाजाच्या आरक्षण आणि विविध प्रमुख मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. सरकारला त्यांनी गेल्या दोन महिन्यांपुर्वी काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मान्य न केल्यामुळे  संभाजी राजे गेल्या तीन दिवसांपासून उपोषणास बसले आहेत.

आज सकाळी वर्षा बंगल्यावर मराठा समन्वयक चर्चेसाठी गेले होते. त्यानंतर चर्चा करुन आल्यानंतर समन्वयकांनी छत्रपतींशी चर्चा केली. बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, अमित देशमुख हे संभाजी राजेंना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा मला आनंदाने सांगायचे आहे. ज्या मागण्या आम्ही ठेवल्या होत्या त्या मान्य झाल्या असल्याचं संभाजी राजे म्हणाले आहेत.

आरक्षणाचे जे फायदे इतर समाजाला दिलेत तेच मराठा समाजाला देणार असून आज आपल्या लढ्याला यश मिळालं आहे, आजचा दिवस हा विजयाचा दिवस असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं, सारथी संस्थेकडून संपुर्ण व्हिजन डॉक्य़ुमेंट ३० जूनपर्यंत पुर्ण करण्याचं आश्वासन दिलं तसंच संस्थेतील रिक्त पदे १५ मार्चपर्यंत सर्व पदे भरणार असल्याच त्यांनी घोषित केलं. सारथीची ८ उपकेंद्र स्थापण करण्यासाठी देण्याचा प्रस्ताव १५ मार्च पर्यंत देणार, शिवाय अण्णासाहेब महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Web Title: Maratha Reservation demands of the Maratha community, Sambhaji Raje went on a fast

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here