Home क्राईम अधिकाऱ्याने महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवत लॉजवर नेऊन बलात्कार

अधिकाऱ्याने महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवत लॉजवर नेऊन बलात्कार

Rape by taking her to a lodge showing the lure of a job

मुंबई: राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत असून अशीच एक घटना उल्हासनगर येथे समोर आली आहे.  महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी २९ वर्षीय महिलेला उल्हासनगर महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून तुर्भे नवी मुंबई येथील लॉजवर नेऊन बलात्कार (Rape) केला असल्याची फिर्याद शनिवारी २६ फेब्रुवारी रोजी एपीएमसी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. हा सर्व प्रकार नोव्हेंबर महिन्यात घडला आहे.

युवराज भदाणे याआधीच जनसंपर्क अधिकारी पदाच्या नोकरीसाठी शाळा सोडण्याच्या जन्मदाखल्यात फेरफार केल्याप्रकरणी फरार झालेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मात्र त्यातच त्याच्यावरआता बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजता नवी मुंबई तुर्भे येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात भदाणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पीडित महिला ही शहरातील कॅम्प नं-२ येथील रहिवासी असून भदाणे यांनी तिला नोकरीचे आमिष दाखवले होते .

महिलेचे दिलेल्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चोपडा कोर्ट येथून सायंकाळी साडे सात वाजता भदाणे नवी मुंबई येथील एका लॉज मध्ये घेऊन गेला आणि तेथे महिलेवर अत्याचार केला. घाबरलेल्या महिलेने अखेर शनिवारी तुर्भे येथील एपीएमसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आणि भदाणे यांच्यावर बलात्काराचा (Rape Crime) गुन्हा दाखल झाला. सध्या भदाणे फरार असून पोलीस पथके त्यांच्या मार्गावर आहेत.

उल्हासनगर महापालिकेचे वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांची जन्मतारीख बोगस व बनावट असल्याचा आरोप जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी आयुक्तांकडे लेखी केल्यावर आयुक्तांनी याबाबत चौकशी समिती नियुक्ती केली होती. चौकशी समितीच्या अहवालात भदाणे याने जन्मतारीख प्रमाणपत्रातील जन्मतारखेत फेरफार करून १ जून १९७२ अशी केल्याचे आढळून आले होते.

Web Title: Rape by taking her to a lodge showing the lure of a job

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here