Home अकोले राजूर: गरजूंना सहानुभूतीऐवजी प्रत्यक्ष मदत गरजेची – सुनिता कोडे

राजूर: गरजूंना सहानुभूतीऐवजी प्रत्यक्ष मदत गरजेची – सुनिता कोडे

राजूर: गरजूंना सहानुभूतीऐवजी प्रत्यक्ष मदत गरजेची – सुनिता कोडे

राजूर: समाजातील गरजूंना व पिडीताना केवळ आधार न देता त्यांना आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करावी. कारण सहानुभूती ऐवजी प्रत्यक्ष मदतीतूनच आपले व्यक्तिमत्व  होते. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनिता कोडे यांनी केले.

अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालय राजूर येथे कै. ललिता बेल्हेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित सौभाग्य महोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धा, पुरस्कार वितरण व निर्भय कन्या अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी सौ. कोडे बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की, पिडीताना केवळ सहानुभूती दर्शविण्याऐवजी प्रत्यक्ष मदतीतूनच व्यक्तीचे व्यक्तिमत्व सिद्ध होते. प्रत्येकात एक सिंह दडलेला असतो. त्याला जागे केले तर आपल्यातील न्यूनगंड कमी होतो आणि आपण ध्येयापासून विचलित होत नाही. चेहऱ्याच्या सौंदर्यापेक्षा बैद्धिक सौंदर्याला महत्व द्या. भारताची संस्कृती व चांगल्या परंपरा जतन करण्याची जबाबदारी केवळ महिलाच पार पाडू शकतात असे प्रतिपादन सत्यानिकेतन संस्थेचे सचिव मा. प्राचार्य टी. एन. कानवडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना नंदकिशोर बेल्हेकर यांनी स्पर्धा आयोजनाचे प्रयोजन व ललिता बेल्हेकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला. या प्रसंगी स्त्री दिलासा केंद्र, राजूर येथील महिला व महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमधील प्राविण्याबद्दल परितोषिकांचे वितरण प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आधार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. देशमुख यांनी केले. तर सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संजय कडलग यांनी केले. याप्रसंगी अनिकेत बेल्हेकर, प्रा. जे. डी. आरोटे, डॉ. गिते, डॉ. ननावरे, शिंदे मॅडम, गभाले मॅडम, घोडे मॅडम, गुंजाळ मॅडम आदी मान्यवर व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि स्त्री दिलासा केंद्रातील महिला उपस्थित होत्या.

Website Title: Need real help instead of sympathy Sunita Kode


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here