Home अकोले अकोले तालुक्यातील चास गावातील एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

अकोले तालुक्यातील चास गावातील एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

अकोले तालुक्यातील चास गावातील एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

अकोले: तालुक्यातील चास गावामधील एका शेतकर्याने आपल्या पत्नी व दोन वर्षाच्या चीमुकलीसह राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हे कुटुंब चास गावातील गाढवी शिवारामध्ये राहत होते. त्यांच्याकडे एक हेक्टर शेती होती व ते मजुरीही करत होते. त्यांनी आपल्या राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. पांडुरंग राधु शेळके (वय ३१), पत्नी सोनाली (वय २१) व मुलगी शिवन्या (वय २) अशी या कुटुंबातील मयत व्यक्तींचे नावे आहेत. संगमनेर तालुक्यातील झोळे या गावातील सोनाली हिच्याशी तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता व त्यांना दोन वर्षाची मुलगीही होती.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

सोमवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास शेजारी राहणारा किशोर कारभारी शेळके हा मित्र सहज त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी गायीचे दुध काढलेले नसल्यामुळे पांडुरंगाला पाहण्यासाठी दरवाजा बंद असल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आला. व  त्याने लगेच आपल्या इतर मित्रांना फोन करून बोलावले. तसेच पोलीस पाटील संदीप वाडेकर यांनी अकोले पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व सहकारी घटनास्थळी पोहचले. घराचा दरवाजा तोडून पंचांच्या मदतीने घरात प्रवेश केला असता पांडुरंग व पत्नी सोनाली , मुलगी शिवन्या घरामध्ये दोरीच्या सहय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अकोले पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे.  

Website Title: Akole taluka news Three of a family in Chas village have suicides


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here