Home नागपूर मामाच्या लग्नाच्या वरातीत भाच्याचा झाला दुर्दैवी मृत्यू- Death

मामाच्या लग्नाच्या वरातीत भाच्याचा झाला दुर्दैवी मृत्यू- Death

Nephew death at uncle's wedding

Nagpur | नागपूर: लग्न हे आनंद घेऊन येत असतं. मात्र नागपूरमध्ये लग्नघरात शोककळा पसरली आहे. मामाच्या लग्नात वरातीत नाचणाऱ्या भाच्याच्या दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्यामुळे घर हादरलं आहे. आनंदात नाचणाऱ्यांवर दु:खाचं सावट पसरलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  नागपुरातील खापा येथे ही घटना घडली. घरात लग्न असल्याने कुटुंब आनंदात होतं. दरम्यान लग्न मंडपात वरात जात होती. याच वेळी सहा वर्षीय चिमुकला आपल्या मामाच्या लग्नात नाचत होता. त्याच वेळी घोड्याने त्याला लाथ मारली. यातच 6 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नवरदेवासह त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला. हशमेल सलमान शेख असं मयत मुलाचे नाव आहे.

मयत हशमेल हा शिवा-सावंग येथील राहणारा असून तो आई-वडिलांसोबत मामाच्या लग्नासाठी खापा येथे आला होता. ज्यावेळी घटना घडली तेव्हा नवरदेव घोड्यावर बसलेला होता. बॅन्डबाजा सुरू होता, आणि सर्वजण नाचत धिंगाणा घालत होती. यादरम्यान एकाने ओवाळणी म्हणून दहा रुपयांच्या नोटा उडवल्या. त्या घेण्यासाठी हशमेल घोड्यामागे गेला. त्याचवेळी घोड्याने हशमेलला लाथ मारली आणि तो जवळच्या दगडावर फेकला गेला. तातडीने हशमेलला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Nephew death at uncle’s wedding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here