Home अहमदनगर दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला पाजले विष

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला पाजले विष

Nevasa Crime husband Wife fight

नेवासा | Nevasa Crime: नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव परिसरात मराठी शाळेजवळ राहत असणारी विवाहित तरुणी आठवडे बाजार असल्याने घरीच होती. वैशाली संदीप झिंजुर्डे  असे या महिलेचे नाव आहे.

पती संदीप रोहिदास झिंजुर्डे  हा घरात दारू पिऊन आला आणिपत्नी वैशालीस म्हणाला दारू पिण्यास पैसे दे असे म्हणत शिवीगाळ करू लागला. यावेळी सासू ताराबाई रोहिदास झिंजुर्डे  व हेमा रामदास गुलार यांनी वैशालीला शिवीगाळ केली. पैसे देण्यास वैशालीने नकार दिला.

यावेळी वैशाली झिंजुर्डे  या तरुणीला खाली पडून एका पायाने हात धरून एका हाताने ग्लासातून विषारी औषध पाजले. विषारी औषध पोटात गेल्याने वैशाली ही बेशुद्ध झाली. श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात तिला उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.

ती शुद्धीवर आल्यावर वैशालीने नेवासा पोलीस ठाण्यात [हिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी पती संदीप रोहिदास झिंजुर्डे , ताराबाई रोहिदास झिंजुर्डे  रा. बेळपिंपळगाव ता, नेवासा हेमा रामदास गुलर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nevasa Crime husband Wife fight

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here