Home क्राईम मनोरुग्ण मुलीवर पाच जणांनी केला अत्याचार, चार जणांना अटक

मनोरुग्ण मुलीवर पाच जणांनी केला अत्याचार, चार जणांना अटक

Nevasa Five people tortured a mentally ill girl

नेवासा(Nevasa): नेवासा बुद्रुक येथील एका २४ वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर पाच जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या बहिणीने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महेश अशोक गोंजारी, संदीप झुंबर जरे, रामेश्वर गुलाब सोनटक्के, भारत चिमाजी इरले रा, सर्व नेवासा यांना अटक करण्यात आली आहे. कैलास गंगाधर जाधव हा आरोपी पसार झाला आहे,

याबाबत माहिती अशी की, पिडीत तरुणी मनोरुग्ण असल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी वेळोवेळी तिला गावाजवळील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यातून तिला दिवस गेले. तसेच आरोपी भारत इरले याने पिडीतेबरोबर लग्न करण्यासाठी घरी येऊन दबाव टाकला. पोलिसांत तक्रार देवू असे सांगूनही भारत इरले हा दबाव टाकतच होता असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Nevasa Five people tortured a mentally ill girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here