Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

Nevasa Molestation of a minor girl

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. नेवासा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील आशुतोष उर्फ बाळासाहेब पंढरीनाथ सांगळे याने या मुलीला गाडीवर बसण्यासाठी जबरदस्ती केली व ती बसली नाही तर चाकूने मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब पंढरीनाथ सांगळे याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेवाळे हे करीत आहे.

Web Title: Nevasa Taluka Molestation of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here