Home नेवासा अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, तरुणास अटक

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, तरुणास अटक

Nevasa Rape of a minor girl by showing the lure

नेवासा | Nevasa: नेवासा येथील शाळेत शिक्षण घेत असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या तरुणास शनीशिंगणापूर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मागील आठवड्यात नेवासा शिवारातील रस्तापूर येथील अशोक रायभान उकिर्डे यांच्या उसाच्या शेतात आंब्याच्या झाडाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि हा सर्व प्रकार कुणाला सांगितल्यास तुला व आई वडिलांना जीवे ठार मारून टाकेन अशी धमकी दिली.

या पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून किशोर रमेश काकडे याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे हे करीत आहेत.  

Web Title: Nevasa Rape of a minor girl by showing the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here