Home राहाता Trupti Desai : तृप्ती देसाई यांना सुपा पोलिसांनी घेतले ताब्यात

Trupti Desai : तृप्ती देसाई यांना सुपा पोलिसांनी घेतले ताब्यात

Shirdi Trupti Desai was taken into custody 

शिर्डी | Shirdi: शिर्डीत साई मंदिरात भारतीय पेहराव परिधान करून प्रवेश करावा, तोकडे कपडे घालून येऊ नये असे आवाहन साई संस्थानने अगोदरच केले आहे. यावर तृप्ती देसाई आक्रमक होत पेहराव बाबतीत नियमांचे जे फलक लावले आहे हे हटविण्याची मागणी केली आहे.

साई संस्थान ने हा फलक हटविला नाही तर आपण स्वतः जाऊन फलक काढू असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यांनतर शिर्डी पोलिसांनी सुरक्षेसाठी ८ ते ११ डिसेंबर या दरम्यान प्रवेश बंदीची नोटीस पाठविली होती. या नोटीसीला धडकावून लावत आज शिर्डीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.

शिर्डीच्या १०० किलोमीटर अगोदरच पोलिसांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी तृप्ती देसाई समर्थक व पोलीस यांच्यामध्ये धक्काबुकी झाली.

सुपे टोल नाक्यावर तृप्ती देसाई यांचा ताफा अडविण्यात आला. आम्ही आमच्या हक्काने लढत आहोत. आज मानवी हक्क दिन आहे आणि आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. मला शिर्डीत बंदीची नगरपंचायतीने नोटीस दिली असली तरी पोलिसांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी इथेच थांबून माझ्या सहकार्याना शिर्डीत जाऊ द्यावे असेही त्या म्हणाल्या.

पोलिसांनी तृप्ती देसाई यांचा ताफा अडविण्यासाठी अगोदरच तयारी केली होती. सुपे टोल नाक्यावरच सकाळपासून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Web Title: Shirdi Trupti Desai was taken into custody 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here