Home श्रीगोंदा दोन नागांना मारण्यासाठी सुडी पेटविली त्यात १० एकर उस जळून खाक

दोन नागांना मारण्यासाठी सुडी पेटविली त्यात १० एकर उस जळून खाक

Shrigonda fire to kill two snakes and burnt 10 acres of sugarcane

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर शिवारात एका सुडीमध्ये दोन नाग घुसल्याने त्यांना मारण्यासाठी सुडी पेटविण्यात आली. या आगीमध्ये शेजारी असणारा १० एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत २० लाखाचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

राजापूर येथील एका शेतकऱ्याच्या बाजरीच्या सुडीत दोन घुसले. काहींनी हे नाग मारण्यासाठी सुडी पेटवून देण्याची शक्कल लढविली. त्यांनी सुडी पेटवून दिली. या आगीचे लोळ वाऱ्याने थेट उसात पोहोचले. या आगीत २० लाखाचा १० एकर ऊस जळाला आहे. हा ऊस ज्ञानेश्वर धावडे व विष्णू गुंजाळ यांच्या मालकीचा होता. या घटनेची माहिर्ती शंकरराव पाडले यांनी कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांना देण्यात आली. त्यावरून राहुल जगताप यांनी शनिवार पासून उस तोडणी सुरु करावी अशा सुचना कुकडी कारखान्याच्या विभागास दिल्या आहेत.

Web Title: Shrigonda fire to kill two snakes and burnt 10 acres of sugarcane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here