Home शेवगाव जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५५ जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५५ जण ताब्यात

Shevgaon Gambling den raided 55 arrested

शेवगाव | Shevgaon: शेवगाव येथील फिरोज ईनामदार यांच्या जागेत विशेष पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत ५५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत ३८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास काही लोक फिरोज इनामदार यांच्या मालकीच्या जागेत जुगार खेळत असताना आढळून आल्याने नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रदीप दिघावकर यांच्या पथकाने रात्री छापा टाकून यामध्ये ५५ लोकांना ताब्यात घेतले. या कारवाईत मोटारसायकल, रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य यासह ३८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल या पोलीस पथकाने जप्त केला. या कारवाईत अनेक प्रतिष्ठित असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. विशेष पोलीस पथकाने विशेष अशी कारवाई केली आहे. या कारवाईने शेवगावमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Shevgaon Gambling den raided 55 arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here