Home नेवासा गाडीतून सात लाखाची दुधाची भुकटीच गेली चोरीस

गाडीतून सात लाखाची दुधाची भुकटीच गेली चोरीस

Nevasa Seven lakh milk powder was stolen

नेवासा | Nevasa: गाडीतून दुधाची भुकटी चोरून नेण्याचा प्रकार नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शेटे यांच्या पेट्रोल पंपावर घडला आहे. शेटे यांच्या पेट्रोल पंप आवारात उभ्या केलेल्या मलाट्रक उचकटून सात लाखांच्या दुध भुकटी गोण्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी सोहेल भैय्या शेख वय २२ रा. घोडेगाव यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार घोडेगाव येथील एकनाथ शेटे यांच्या पेट्रोल पंपासमोर उभ्या केलेल्या ट्रक(एम.एच. १६ सीसी ७४५१) मधून अज्ञात चोरट्यांनी ट्रकची मागील बाजूची ताडपत्री कापून दुध पावडरच्या १४८ गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या १४८ गोण्या ७ लाख १० हजार ५४८ रुपये किमतीच्या आहेत. या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करीत आहेत.   

Web Title: Nevasa Seven lakh milk powder was stolen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here