Home श्रीगोंदा दोन पानसेंटरवर छापा टाकून दोन गुटखाकिंग अटकेत

दोन पानसेंटरवर छापा टाकून दोन गुटखाकिंग अटकेत

Shrigonda Two gutkhaking arrested for raiding two pansenters 

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील जाणता राजा व शिवकृपा पानसेंटरवर छापा टाकत सुमारे आठ लाख रुपये किमतीचा गुटखा व एक मारुती कार जप्त करण्यात आली. श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी केली. या या कारवाईने अवैध धंद्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

काष्टी येथील सचिन पांडुरंग कोकाटे व दीपक नाना टकले या गुटकाकिंगाना अटक करण्यात आली आहे. काष्टीतील पानटपऱ्या मध्ये गुटखा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले  यांना मिळाली. यावरून गुरुवारी संध्याकाळी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल किरण बोराडे, अमोल आजबे, किरण भापकर, संतोष कोपनर, कुलदीप घोळवे, गोकुळ इंगवले यांनी या दोन टपऱ्यावर छापे टाकत तीन व पाच लाखाचा गुटका जप्त करण्यात आला. तसेच गुटखा वाहतूक करणारी मारुती कार जप्त करण्यात आली.

Web Title: Shrigonda Two gutkhaking arrested for raiding two pansenters 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here