Home अहमदनगर पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Nevsa Police personnel caught by bribe

नेवासा | Nevasa: पंचानामा प्रत व शावविचेदन अहवाल देण्याच्या बदल्यात १० हजार रुपयांची लाच (Bribe) घेतल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सोमनाथ अशोक कुंढारे वय ३३ यास नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने काल रंगेहाथ पकडत अटक केली आहे.

याबाबत लाचलुचपत विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार तक्रारदारांच्या नातेवाईकाचे मोटार अपघातात निधन झाले होते. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या मयत व्यक्तीचा शावविचेदन अहवाल व पंचनाम्याची प्रत मिळावी अशी मागणी तक्रारदरांनी केली होती. त्याबदल्यात आरोपी  सोमनाथ अशोक कुंढारे याने १५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीने १० हजार रुपये देण्याचे ठरले. ती रक्कम काल पोलीस ठाण्यात सोमनाथ अशोक कुंढारे याने स्वीकारली. यावेळी सापळा रचत लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

Web Title: Nevsa Police personnel caught by bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here