Home अहमदनगर नातवाने आजोबावरच केले कोयत्याने सपासप वार, चुलता, चुलती यांच्यावरही केला हल्ला: Crime

नातवाने आजोबावरच केले कोयत्याने सपासप वार, चुलता, चुलती यांच्यावरही केला हल्ला: Crime

Newasa Crime grandson attacked his grandfather with a scythe

Newasa Crime | नेवासा: घरगुती कारणातून नातवाने आजोबावरच कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली असून यामध्ये आजोबा जखमी झाले आहे. आजोबाला सोडविण्यासाठी गेलेल्या चुलता, चुलती, भाऊ यांच्यावरही हल्ला केला असून त्यांना जखमी केले आहे. रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी नातू गोकुळ क्षीरसागरला पोलिसांनी अटक करण्यात आली असून नेवासा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  नारायणवाडी येथील गोकुळ मधुकर क्षीरसागर हा रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरासमोर कोयता हातात घेऊन घराच्या दरवाज्यासमोर कोयता मारत होता. आजोबा जालिंदर मुकिंदा क्षीरसागर यांनी त्याला दरवाजावर कोयता मारण्याचं कारण विचारलं असता त्यावर आरोपी नातू गोकुळ म्हणाला की, मला लग्नाला इतकी वर्षे झाले तरी मुलबाळ होत नाही. आता तुमच्याकडे बघतोच तुम्हाला मारुनच टाकतो असे म्हणून त्याने आजोबांच्या तोंडावर कोयत्याचे वार केले.

अचानक झालेल्या या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. गोकुळला रोखण्यासाठी त्याचे चुलते बाबासाहेब जालिंदर क्षीरसागर, चुलती स्वाती बाबासाहेब क्षीरसागर आणि चुलत भाऊ विश्वास बाबासाहेब क्षीरसागर हे आले. मात्र गोकुळने त्यांच्यावरही कोयत्याने वार केला. त्यात ते जखमी झाले. जखमींवर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी गोकुळ क्षीरसागरला पोलिसांनी अटक केली.

Web Title: Newasa Crime grandson attacked his grandfather with a scythe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here