दाम दुप्पट करून देतो, शेतकऱ्याला तब्बल पावणे दोन कोटीला चुना
नेवासा | Newasa Fraud Crime: नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील प्रसाद नंदकिशोर भणगे या शेतकर्याला लोभामुळे चांगलाच प्रत्यय आला आहे. दोन वर्षात दामदुप्पट पैसे करून घेण्याच्या लोभात त्यांना पारनेर तालुक्यातील सहा महाठगांनी सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.
त्या सहा फसवणूक करणार्या सहा ठगांना नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी प्रसाद नंदकिशोर भणगे (वय 26 वर्षे, रा.भानसहिवरा मारुती तळे, ता.नेवासा) यांचा सहा जणांनी विश्वास संपादन करुन दोन वर्षात रक्कम दाम दुप्पट करुन देतो, असा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या बोलण्याला बळी पडून भणगे यांना त्या सहा जणांनी तब्बल एक कोटी ७९ लाख रुपयांना गंडा घातला.
ही घटना ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 रोजी नेवासा फाटा व अहमदनगर येथे घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात वैभव अनंत चेमटे, अनंत दत्तात्रय चेमटे, भुषण अनंत चेमटे (सर्व रा.भाळवणी ता. पारनेर जि. अहमदनगर) तसेच बाळासाहेब दगडू सालके, भाऊसाहेब सदाशिव सालके (दोघे रा.काळकूप ता.पारनेर जि.अहमदनगर), निलेश भाऊसाहेब शिंदे (रा.टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि.अहमदनगर) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Newasa Fraud Crime doubles the price