Home क्राईम महिलेला गुंगीचे औषध देऊन नग्नावस्थेतील फोटो, व्हिडिओ काढत धमकी देऊन वारंवार बलात्कार...

महिलेला गुंगीचे औषध देऊन नग्नावस्थेतील फोटो, व्हिडिओ काढत धमकी देऊन वारंवार बलात्कार  

rape by threatening to take nude photos and videos of a woman being drugged

पिंपरी: पिंपरीतील धक्कादायक वकिलाने बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका वकिलाने एका महिलेला कामानिमित्त हॉटेलवर भेटायला बोलावून महिलेला गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार (Rape) करून महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडिओ काढून  ते व्हायरल (porn Photo and Video ) करण्याची धमकी देत वकिलाने वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडीत महिलेने २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार जून, जुलै २०१८ ते तीन फेब्रुवारी २०२२ या कालावधीत पिंपरी, शिवाजीनगर, वडगावशेरी, खराडी या भागात घडला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

याबाबत अॅड. अजय अप्पाराव साताळकर आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अॅड. अजय अप्पाराव साताळकर ने  फिर्यादी महिलेसोबत ओळख वाढवली अन मैत्री मात्र शरीरसंबंधांच्या त्याच्या मागणीस फिर्यादीने नकार दिला;  तरीही एसआरए मोठे काम मिळाले असल्याचे सांगून पक्षकारांसोबत कामाबाबत बोलणी करून काम समजून घेण्यासाठी फिर्यादीला पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले.

हॉटेलवर पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि फिर्यादीचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडिओ शूट केले. फिर्यादीसोबत लग्न करणार असल्याचे सांगून हा प्रकार कोणालाही न सांगण्याची आरोपीने धमकी दिली. आरोपीने फिर्यादीला पुन्हा भेटण्यासाठी संपर्क केला असता फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे फिर्यादीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादीला विविध ठिकाणी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध (Sexual relation) ठेवले.

इतर दोन महिला आरोपींनी फिर्यादीस मारहाण, शिवीगाळ व धमकी देऊन माफी मागण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ करून फिर्यादीचे फोटो व व्हिडिओ तिच्या बहिणीच्या मोबाइलवर पाठवले. फिर्यादीच्या पतीला ते फोटो दाखवून फिर्यादीला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: rape by threatening to take nude photos and videos of a woman being drugged

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here