Home अहमदनगर नवविवाहितेस गळफास घेऊन आत्महत्या करण्यास करण्यास भाग पाडले

नवविवाहितेस गळफास घेऊन आत्महत्या करण्यास करण्यास भाग पाडले

newlyweds were forced to commit suicide by hanging

नेवासा  | Newasa: चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मुलीस पती व सासूने हुंड्यासाठी छळ करुन आत्महत्या करण्यास भाव पाडल्याची घटना नेवासाफाटा येथे घडली. याबाबत नवविवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime Filed) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गणेश रंगनाथ बोके (वय 42) धंदा-नोकरी रा. वाहेगाव ता. पैठण जि. औरंगाबाद यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, त्यांची मुलगी सोनाली हिचा विवाह विकास हरिभाऊ पुंड रा. नेवासाफाटा (मुकिंदपूर) ता. नेवासा याचेशी 24 डिसेंबर 2021 रोजी झाला होता. त्यानंतर एक महिना ते 4 एप्रिल 2022 या काळात मुलगी सोनाली विकास पुंड (वय 19) हिस हुंड्याच्या पैशाच्या कारणावरुन तसेच लग्नात संसारोपयोगी वस्तू न दिल्याने तिचा पती विकास हरिभाऊ पुंड व सासू सिमा हरिभाऊ पुंड यांनी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देवून व हुंड्याच्या 50 हजार रुपयांची मागणी करुन तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. तसेच पैसे आणले नाही तर तुला जीवे ठार मारुन टाकीन असे म्हणून तिला गळफास घेवून आत्महत्या करण्यास भाग पाडले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 289/2022 भारतीय दंड विधान कलम 304(ब), 498(अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: newlyweds were forced to commit suicide by hanging

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here