Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पिडीतेने दिला मुलीला जन्म

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पिडीतेने दिला मुलीला जन्म

Sexually Assault on a minor girl, the victim gave birth to a girl

Ahmednagar | अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Sexually Assault) केल्याने गर्भवती राहिलेल्या पिडीतेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजीद खान साहब खान रा. पंचपीर चावडी अहमदनगर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपीने शहरात राहत असलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. मागील दोन वर्षापासून आरोपीने पिडीतेवर अत्याचार केल्याने तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर तिची येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीने पोलीस ठाणे गाठले व आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक एस. के. दुर्गे हे करीत आहे.

Web Title: Sexually Assault on a minor girl, the victim gave birth to a girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here