Home अकोले अकोले घटना: महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला केले ठार

अकोले घटना: महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला केले ठार

राजूर: अकोले तालुक्यात शिरपुंजे परिसरात महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पिडीतेच्या संतप्त नातेवाईकानी गावात आणून सिमेंटच्या बाकास बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर या आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिरपुंजे येथील पिडीत महिला मंगळवारी जनावरे चारण्यासाठी शिवारात गेली होती तेथे दुपारी साडे बाराच्या सुमारास आरोपी राजू गणपत सोनवणे वय ४५ याने या महिलेवर अत्याचार केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिडीत महिलेला नातेवाईकानी संघ्याकाळी या आरोपीचा शोध घेऊन त्यास गावात आणले त्यास सिमेंटच्या बाकड्यास बांधून मारहाण केली.

या मारहाणीत तो जबर जखमी झाला. त्यानंतर त्यास राजूर येथे आणले. तेथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. राजूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अटक केली आहे.  

Website Title: News accused of mistreating woman killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here