Home अकोले अकोलेतील घटना: प्रेमीयुगलांची आत्महत्या

अकोलेतील घटना: प्रेमीयुगलांची आत्महत्या

राजूर(News): एका प्रेमियुगालाने विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना तालुक्यातील साकीरवाडी येथे घडली आहे. यातील प्रेयसी ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे शिक्षण घेत होती. तर तिचा प्रियकर हा विवाहित असून मंडप व्यवसाय करीत होता. यातील मयत मुलीचा विवाह जमलेला होता.ती लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार होती. मात्र तिने त्या अगोदरच आपल्या प्रियकरासोबत आपली जीवनयात्रा संपविली.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत राजूर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, साकीरवाडी येथील पांढरीच्या शेतात रोगार हे विषारी औषध सेवन करून अशोक मारुती भांगरे वय ३२ व एक युवती रा. साकीरवाडी ता. अकोले यांनी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या पूर्वी आपली जीवन यात्रा संपविली आहे. गावाचे पोलीस पाटील गोपीनाथ दगडू जगताप यांनी राजूर पोलिसांना खबर दिली यावरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार नेहे हे करीत आहे.  


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: News suicide of Sweetheart in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here