Home अकोले कोतुळचे आंदोलन सुरूच, मागण्या मान्य करा मगच आंदोलन मागे

कोतुळचे आंदोलन सुरूच, मागण्या मान्य करा मगच आंदोलन मागे

कोतूळ(Kotul): विविध मागण्यांसाठी कोतूळ येथील मुक्काम आंदोलन आता निर्णायक स्तरावर आले आहे. पिंपळगाव पाण्याचे आभाळवाडीपर्यंत न्याय वाटप आणि कोतूळ पुलाचे काम सुरु होत नाही तोपर्यंत सत्याग्रह आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

कोतूळ येथील मुक्काम आंदोलनाचा गुरुवार हा चौथा दिवस आहे. बुधवारी तहसीलदार मुकेश कांबळे, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आ. किरण लहामटे सभापती दत्ता बोऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख यांनी चर्चा केल्या.

चार दिवसांपासून रात्रीच्या कुडकुडत्या थंडीत किमान पन्नास आंदोलनकर्ते मुक्कामी आहेत. दोन मुक्काम आंदोलकांची चौथ्या दिवशी दुपारी चार वाजता तबीयत खालावली आहे.मात्र कोणतेही वैद्यकीय अधिकारी न फिरकल्याने आंदोलकांचा रोष वाढला आहे. दाखल न घेतल्याने आरोग्य विभागाचा आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.   

वाचा: Live News: अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: News demands then back the agitation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here