Home अकोले भंडारदरा पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन: पहा कसे आवर्तने सुटणार

भंडारदरा पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन: पहा कसे आवर्तने सुटणार

अकोले: भंडारदरा निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या आउटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवार किंवा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे.

सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या दोन्ही धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.

सध्या भंडारदरा १० हजार ८०३ दशलक्ष घनफूट तर निळवंडेमध्ये ७ हजार ९१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत रब्बीसाठी एका आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. हे आवर्तन बुधवारी नियोजित होते मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने गेट दुरुस्तीचे काम सुरु आहे तरी हे आवर्तन रविवारी किंवा सोमवारी सोडण्यात येईल. असे जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता गणेश हारदे यांनी सांगितले.

वाचा: सुकेवाडीत बिबट्याचा तरुणावर हल्ला: गंभीर जखमी

या वर्षी मुबलक प्रमाणात पाउस पडल्याने रब्बीसाठी पाण्याची मागणी तुलनेत कमी आहे. या आवर्तनात सुमारे अडीच ते तीन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. हे आवर्तन २५ दिवस चालण्याचा अंदाज सहायक अभियंता हारदे यांनी व्यक्त केला.

रब्बीच्या अवर्तानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळ्याचे पहिले आवर्तन सुटणार असून त्यानंतर दोन असे उन्हाळ्यासाठी एकूण तीन आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.

Website Title: News Bhandaradara water supply rotation planing 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here