Home महाराष्ट्र फोन टॅपिंग आरोपाबाबत फडवणीस भडकले, म्हणाले……

फोन टॅपिंग आरोपाबाबत फडवणीस भडकले, म्हणाले……

मुंबई: भाजप सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन तसेच  व्हॉट्स अॅप मेसेजस  टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. गृह खात्यानं सायबर सेलच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी करण्याचं ठरविलं आहे.

या संपूर्ण प्रकरणावरून ठाकरे सरकारने भाजपला धारेवर धरलं आहे. फोन टॅपिंग करणे ही विकृती असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर, फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं मला दिली होती, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

भाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचे आरोपाचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केलं आहे. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं आहे.

Website Title: News Phone tapping allegations erupted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here