Home महाराष्ट्र भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी: जयंत पाटील

भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी: जयंत पाटील

मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्व बाबत गुड कायम असताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असे भाजपला वाटत असून त्यासाठीच त्यांचे खटाटोप चालू आहेत. असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

वाचा: दोन मुलांवर गोळ्या झाडून वडिलांची आत्महत्या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यात महाराष्ट्रामध्ये माध्यमांची गळचेपी सुरू आहे. अघोषित आणीबाणीसदृष्य स्थिती निर्माण झालेलीं आहे. यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा,  अशी विनंती फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्राचा उल्लेख करत पाटील यांनी टीका केली आहे.  फडवाणीसानी जे पत्र दिले आहे त्यामधून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असा  सूर निघत असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

Website Title: News BJP wants presidential rule in Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here