Home अहमदनगर दारूसाठी ग्राहकांची झुंबड, दारू दुकाने उघडण्यावर टीका

दारूसाठी ग्राहकांची झुंबड, दारू दुकाने उघडण्यावर टीका

मुंबई: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कॅटोनमेंट झोन सोडून रेड, ग्रीन, ऑरेज या तीनही झोनमध्ये सशर्त सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तीनही झोनमध्ये दारू विक्रीला परवानगीही देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजपासून दारू विक्री सुरु करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दारूपासून वंचित असलेल्या दारूप्रेमींनी सकाळपासूनच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

अहमदनगर: अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांनी दारूची दुकाने उघडण्याची घाई का केली असा प्रश्न उपस्थित केला आहे. नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात दारूची दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दारू ही जीवनावश्यक गोष्ट आहे का अशी टीका नगर जिल्ह्यातून सुरु झाली आहे.

अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी मंगळवारपासून दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. दारूबंदी आंदोलनातील सामजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी दारू दुकानातील गर्दी  संसर्गाला कारणीभूत ठरेल. प्रशासनाला एवढी घाई का का होतेय. नागपूरसारख्या ठिकाणी दारूची दुकाने उघडू दिली नाही. नगरलाच काय आणीबाणी आली होती. फक्त महसूल मिळतो म्हणून दारूची दुकाने सुरु करणे अयोग्य आहे असे ते म्हणाले.

Website Title: News Criticism of liquor store openings

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here