Home संगमनेर संगमनेर: काकडवाडी येथील विवाहित महिला बेपत्ता

संगमनेर: काकडवाडी येथील विवाहित महिला बेपत्ता

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथून ५ मार्च २०२० रोजी रात्रीच्या सुमारास घरातून कुणालाही न सांगता निघून गेली. आज दोन महिने झाले तरीही या महिलेचा तपास लागलेला नाही.

रोहिणी केशव शिरसाठ वय ही काकडवाडी येथे पती केशव साहेबराव शिरसाठ व मुलगी इंद्रायणी असे तिघे एकत्र राहत होते. पती शेतीकाम करत असून रोहिणी शिरसाठ या घरकाम करत होत्या. मात्र  मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास रोहिणी या कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्या. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली असून आज दोन महिने झाले तरीही या महिलेचा तपास लागलेला नाही. बेपत्ता महिलेचे वर्णन रंगाने गोरी, उंची ५ फुट, शरीराने मध्यम, नाक सरळ चेहरा गोल, डोळे काळे तसेच हातावर गोंधलेले, लांब केस असा पेहराव असून सदर महिला कुणाला मिळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.  

ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. 

Website Title: Latest News Married Female Betel Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here