Home अहमदनगर कारवाई करणाऱ्या पोलिसाला धक्काबुकी करत मारहाण

कारवाई करणाऱ्या पोलिसाला धक्काबुकी करत मारहाण

अहमदनगर: मास्क न घालता शहरात फिरणाऱ्यावर कारवाई करत असताना पोलीस कर्मचारीशी हुज्जत घालून मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपी प्रमोद पगारे याला अटक करून तत्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नगर शहरातील भारत चौक येथे शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे.

पोलीस कर्मचारी महेंद्र सागर यांना मारहाण करण्यात आली आहे. सागर यांच्या फिर्यादीवरून प्रमोद पगारे याच्याविरुद्ध मारहाण, सरकारी कामात अडथळा, जिल्हधिकारी यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात सागर हे गस्त घालत विनाकारण फिरणारे यांच्यावर कारवाई करतात. शनिवारी सायंकाळी ते पथकासह सिव्हिल हाडकोतील भारत चौक येथे कारवाई असताना त्या वेळी प्रमोद पगारे हा तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरत असल्याने त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत असतानात्याला राग आल्याने पगारे याने पोलिस कर्मचारी सागर यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी पगारे याला पकडून  त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  पगारे याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.   

Website Title: News Police in riot gear stormed a rally

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here