Home संगमनेर संगमनेर तालुक्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याने कोयत्याने मारहाण, गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याने कोयत्याने मारहाण, गुन्हा दाखल

संगमनेर: तालुक्यातील माळेगाव येथे दोघाना कोयत्याने मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवार दिनाक ३ मे रोजी घडली लग्नापूर्वी आमचे प्रेमसंबंध असल्याने तू हिला टाकून दे असे सांगत वादावादी होऊन हि मारहाण करण्यात आली. यात दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सोमनाथ रामदास खालटे रा. आष्टी जि. बीड व वेनुनाथ माधव काळे रा.माळेगाव हवेली ता. संगमनेर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे अकोले तालुक्यातील एक कुटुंब राहण्यास आले होते. या कुटुंबातील तरुणाने श्रमिकनगर संगमनेर येथील एका मुलीबरोबर लग्न केले. मात्र आठ महिन्यानंतर दोन तरुण येऊन संभंधित मुलीच्या  पती व दिरास सांगितले की,आमचे हिच्यासोबत प्रेमसंबंध आहे त्यामुळे तू हिला टाकून दे तिला एकटीला राहू दे. याप्रकारानंतर पती व दिराने आरोपींना समजावून सांगितले. मात्र हा वाद विकोपास जाऊन काळे व खालटे यांनी कोयत्याने मारहाण करत शिवीगाळ केली. आमच्या नादाला लागाल तर पेट्रोल टाकून जाळून मारीन अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी जखमीच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Website Title: Latest News Sangamner  love affair before marriage Crime

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here