बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार
अकोले(News): बियाणांची बँक चालविणाऱ्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील रहिवासी बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालविणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचे नावलौकिक आहेत. या सन्मानाने अकोले तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रासायनिक शेतीमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी राहीबाई पोपेरे प्रयत्न करीत आहे. सुरुवातीपासूनच शेतीची आवड असल्याने त्यांनी भाजीपाल्यासह अन्य पिकांचे गावरान वाण जपण्याचा बिया संकलित करण्याचा वसा हाती घेतला होता. सुमारे वीस वर्षापासून त्यांचे अथक प्रयत्न सुरु आहेत.
त्यांनी आत्तापर्यंत जवळपास ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. गावरान वाण शोधणे, बिया काढून संकलित करणे, इतरांना पेरणीसाठी प्रेरणा देणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे, नवनवीन वाणाच्या बियाणांचे संकलन करणे अशा पद्धतीने बीज बँकेचा विस्तार त्यांनी केला.
विषमुक्त शेतीचा प्रयोग राज्य व बाहेरूनही लोक त्यांच्याकडे येत असतात. शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेताकडे वळावे ,आपल्या शेतीचे आरोग्य जपावे यासाठी त्या नेहमीच कार्यशील आहेत. त्यांच्या या अथक प्रयत्नांतूनच त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Website Title: News PadmaShri Award to Bijmata Rahibai Popere