Home राष्ट्रीय कॉंग्रेसची नरेंद्र मोदींना संविधान प्रत भेट

कॉंग्रेसची नरेंद्र मोदींना संविधान प्रत भेट

नवी दिल्ली(News): देशात उठलेल्या नागरिकत्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर आणि प्रजासत्ताक दिन यानिमित्ताने कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची एक प्रत भेट म्हणून पाठविण्यात आली आहे. अमेझोन वरून ही प्रत पाठविण्यात आली आहे. या संविधानाची किंमत १७० रुपये असून हे पैसे मोदी यांनाच भरावे लागणार आहेत.

कॉंग्रेसचे सोशियल मेडीया सेलचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. प्रिय पंतप्रधान मोदीजी, तुम्हाला संविधानाची एक प्रत पाठवली आहे. लवकरच तुम्हाला ती मिळेल. देशामध्ये फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर कृपया संविधान अवश्य वाचा, अशी टीका गुप्ता यांनी ट्विटरवरून केली आहे.

News Sanvidhaan Narendra modi

केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर संविधानाची प्रत पाठवण्यात आली आहे. अॅमेझॉनवरून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून हे संविधान पाठवण्यात आलं असून त्याचे पैसे मोदींनाच भरावे लागणार आहेत.  

संविधानाच्या अनुच्छेद १४ नुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे, हे भाजपला अजून समजलेलं नाही.

Website Title: News Congress gift to Narendra Modi constitution

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here