Home अकोले आमदार किरण लहामटे यांच्या उपस्थितीत कला क्रिडा शिक्षकांचे आंदोलन यशस्वी

आमदार किरण लहामटे यांच्या उपस्थितीत कला क्रिडा शिक्षकांचे आंदोलन यशस्वी

राजूर(News): अखिल भारतीय किसान सभा, सिटू व  डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली आदि(अकोले) येथे सुरू असलेल्या आंदोलनाची  आवासी विकास प्रकल्प राजुर ज सातव्या दिवशी  यशस्वी सांगता झाली.

शेतकरी नेते डॉ अजित नवले, आमदार किरण लहामटे व विनयजी सावंत यांनी प्रशासन व आंदोलकांमध्ये चर्चा घडवून आणत आंदोलकांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

पूर्वी काम केलेल्या कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना अन्यायकारकपणे डावलण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेला या आंदोलनामुळे स्थगिती देण्यात आली.

पेसा कायद्या अंतर्गत स्थानिकांना प्राधान्य देण्यासह अन्य अनेक बाबींचा समावेश असलेला प्रस्ताव यावेळी तयार करण्यात आला.

चार तास चाललेल्या बैठकीत तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावावर दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्री ना. के.सी.पडावी यांच्यासोबत बैठक घेऊन या संदर्भतील कायदेशीर व प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन यावेळी आ.किरण लहामटे यांनी दिले.

प्रकल्प अधिकारी श्री ठुबे यांनी चर्चेत अत्यंत सकारात्मक भूमिका घेत प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य केले.

पेसा क्षेत्रातील स्थानिकांना व शासकीय आश्रमशाळा किंवा जि.प.शाळा येथे विना मानधन सेवा केलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन यावेळी श्री ठुबे यांनी आंदोलकांना दिले.

कॉम्रेड सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, विद्रोहीचे स्वप्नील धांडे , कातडे भाऊराव, दत्ता बारामते,नामदेव बारामते,बांगर राम यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

Website Title: News sports teachers movement successful

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here