Home अकोले जि.प. प्रा. शाळा दोडकनदी,देवाचीवाडी, काठवटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक...

जि.प. प्रा. शाळा दोडकनदी,देवाचीवाडी, काठवटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा

अकोले(News,गणपत सहाणे): प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोडकनदी येथे तीनही शाळांचा कार्यक्रम संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आल्या. तद्नंतर मुलांनी आपल्या विविध गुणदर्शनाद्वारे उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली. यावेळी मुलांनी भाषण ,गीत गायन ,नृत्य ,लेझीम टिपरी,उखाणे,रेकॉर्ड डान्स असा वेगवेगळ्या प्रकारचा कलाविष्कार सादर केला. सर्वांनी मुलांचे भरभरून कौतुक केले.

यावेळी देवठाण येथील माजी सरपंच रमेश बोडके व मंगा रामजी पथवे यांनी शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या सीताबाई पथवे यांनी मार्गदर्शन केले व शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले . या कार्यक्रमास देवठाण ग्रामपंचायत सदस्य खेमा पथवे तसेच तीनही शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदस्य, पालक,शिक्षण प्रेमी,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा सेविका, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत सहाणे व भाऊसाहेब हासे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूनाजी पथवे,प्रतिक नेटके ,वैशाली आरोटे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुपेश वाकचौरे यांनी केले.

Website Title: News republican day in Devthan 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here