Home अकोले डाॅ.राजेंद्रप्रसाद आश्रमशाळा शेणित येथे खगोलीय प्रयोगशाळेचे उद्घाटन

डाॅ.राजेंद्रप्रसाद आश्रमशाळा शेणित येथे खगोलीय प्रयोगशाळेचे उद्घाटन

शेणीत(News): डाॅ.राजेंद्रप्रसाद प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत वेधशाळा व खगोलिय प्रयोगशाळेचे उद्घाटन लायन श्रीराम भालेराव,अध्यक्ष लायन्स क्लब पुणे सुप्रीम यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी खगोल  शास्रज्ञ डाॅ.विशाल कुंभारे  उपस्थित होते.  विद्यार्थ्यांना आवकाशास्त वस्तूंचे निरिक्षण करता यावे व खगोल शास्राचा सखोल  अभ्यास करता यावा यासाठी लायन्स क्लब पुणे सुप्रीम यांचे सहकार्याने खगोलिय प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली.

यावेळी डाॅ. कुंभारे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले विद्यार्थी रात्रीच्या वेळी आकाशातील चंद्र, ग्रह ,तारे, तारकापुंज यांचे निरिक्षण करु शकतात.विज्ञान व भौगोलिक प्रयोगही विद्यार्थी करु शकतात. खगोलिय अभ्यासात प्रगती होत असली तरीही खगोलशास्रात अभ्यासाला , संशोधनाचा विद्यार्थ्यांसाठी खुप संधी आहे. तार्यांचा जन्म त्यांची वाढ व मृत्यू कसा होतो हे विद्यार्थ्यांना अभ्यासता येईल.

यावेळी लायन्स क्लब पुणे सुप्रीम चे अशोक मिस्रि,सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी.एन्.कानवडे,सहसचिव मिलिंद उमराणी, संचालक प्रकाश टाकळकर, एस्.टी.येलमामे, बारेकर सर, सुनिता भालेराव , सिमा दातार, मुख्याध्यापक संजयकुमार शिंदे मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.

वाचा: संगमनेर तालुक्यातील एका महिलेने अचानक बिबट्याला पहिल्याने हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

या प्रयोगशाळेत राॅकेट लाॅचिंग माॅङेल तसेच चांद्रयान माॅडेलही  बसविण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मिस्रि यांनी केले तर आभार शामराव साबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. युवराज गभाले यांनी केले.

Website Title: News Shenit Inauguration of astronomical laboratory

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here