Home अकोले अकोले: हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पकडली गोवंश कत्तल खाण्याकडे घेऊन जाणारी पिकअप

अकोले: हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पकडली गोवंश कत्तल खाण्याकडे घेऊन जाणारी पिकअप

अकोले: अकोले शहरापासून जवळच असणाऱ्या बाजारसमिती पासून पुढे कुंभेफळ रस्त्यावर पाठलाग करून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ६ गोवंश कत्तल खाण्याकडे घेऊन जाणारी पिकअप गाडी पकडली असून या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गोट्या उर्फ परवेज अमीर अली शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.   

 याप्रकरणी विश्व् हिंदू परिषदेचे कार्यकर्ते संदीप रसाळ यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून यामध्ये पुढे असे म्हटले आहे कि, दिनांक २२ जून सायंकाळी ८. ३० वाजनेचे सुमारास मी घरी जात असताना विशाल मारुती पवार याचा फोन आला कि , कुंभेफळ मार्केटयार्ड जवळ पिकअप गाडी क्रमांक  एम.एच. १४ एफ.टी. ०४४६ हिच्या  मध्ये ३ गाया ,३ वासरे दाटीवाटीने पिकअप मध्ये भरून संगमनेरला घेऊन चालला आहे, आम्ही पिकअप चालकास पकडून ठेवले आहे व एक जण पळून गेला आहे असा फोन आल्याने मी लगेच तिकडे गेलो असता तेथे सफेद रंगाची पिकअप गाडी सांगितल्याप्रमाणे होती चालकाला त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव परवेज अमीर अली शेख रा. इस्लामपेठ ता. अकोले असे सांगितले असता त्यास सदर गायी व वासरे दाटीवाटीच्या कोठे घेऊन चालला आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, सदर गाया मी शेरणखेल मधून घेतल्या असून त्या मी घेऊन चाललो आहे. तसेच त्याच्या सोबत असलेल्या पळून गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यावर आमची खात्री झाली की, सदरची गायी व वासरे हि कत्तलखान्यात कत्तलीसाठी चालविली आहेत. त्यानंतर मी, विशाल मारुती पवार, भाऊसाहेब बाबुराव चव्हाण, भारत भाऊसाहेब चव्हाण, दत्तात्रय किसन नवले, जयसिंग चंदन बोऱ्हाडे, विनायक नरहरी साबळे अश्यांनी सदर पीकअप, पीकअप ड्राइव्हर व गायी असे पोलीस स्टेशनला घेऊन आलो आहे. पीकअप मधील भरलेल्या जनावरांमध्ये-

१) ५०,०००/- रु. किमतीच्या तीन गायी १ तांबड्या रंगाची, २ शवरा रंगाच्या, शिंगे असलेल्या,

२) ९,०००/- रु. किंमतीचे ३ लहान वासरे, बारीक शिंगे, टिपके असलेले,

३) २,००,०००/- रु. किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा पीकअप नं. एम.एच. १४ एफ.टी. ०४४६ पांढऱ्या रंगाचा जु. वा. किं. अं.  २,५९,०००/- रु. एकूण येणे प्रमाणे वरील वर्णनाचे अशोक लेलंड पीकअप गाडी नं.  एम.एच. १४ एफ.टी. ०४४६ हिच्यामध्ये पिकअप चालक परवेज अमीर अली शेख रा. इस्लामपेठ, ता. अकोले व पळून गेलेला एक अज्ञात इसम नाव गाव माहित नाही यांनी वरील वर्णनाच्या जिवंत ३ गाया व ३ वासरे कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयीतिने व दाटीवाटीने भरलेल्या अवस्थेत कुंभेफळ रोड मार्केट यार्ड जवळ आज दिनांक २२/०६/२०२० रोजी सायंकाळी ८.३० वा. चे सुमारास मिळून आले आहे. म्हणून माझी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.यावरून अकोले पोलिसांनी आरोपी परवेज अमीर अली शेख रा. इस्लाम पेठ , अकोले याचेविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० सेकशन ३,११ अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कुऱ्हाडे हे तपास करीत आहे.

Website Title: News Pickup that leads to eating the slaughtered beef

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here