Home संगमनेर निळवंडे कॅनॉलमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह

निळवंडे कॅनॉलमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह

संगमनेर(News): संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारात जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कोरड्या कालव्यात ४० वर्ष वयाचा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावर निळवंडे कोरड्या कालव्यात अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांना मिळाली. सुपेकर यांनी खात्री करून संगमनेर पोलीस स्टेशनला कळविले. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल परमेश्वर गायकवाड लक्ष्मण औटी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. संगमनेर इथे उत्तरणीय तपासणीसाठी हलविला. मृताच्या नाकातून व डाव्या कानानातून रक्त बाहेर येत होते. मृताच्या अंगावर गुलाबी फुल साईजचा शर्ट , आतून पांढरे बनियान, बनियांच्या आत काळ्या रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची अंडरवेअर, निळ्या रंगाची फुल पॅनट असे मृताच्या पेहरावाचे वर्णन आहे. संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Website Title: News Unidentified body in Nilwande Canal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here