Home अकोले अकोले: निळवंडे कालव्यांची कामे पोलीस बंदोबस्तात सुरु होणार

अकोले: निळवंडे कालव्यांची कामे पोलीस बंदोबस्तात सुरु होणार

निळवंडे कालव्यांची कामे पोलीस बंदोबस्तात सुरु होणार

अकोले: निळवंडे धरणाचे रखडलेले अकोले तालुक्यातील कालव्यांचे काम उच्च न्यायालयाने पोलीस संरक्षण दिल्यास आठ दिवसांत सुरु करू या प्रकल्पाचा निधी तापी खोर्यात दिला जाणार नाही व बंद कालव्यांची योजना अव्यवहार्य असल्याने करण्यात येणार नाही असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर जलसंपदा विभागाने सादर केले. या निर्णयामुळे लवकरच अकोले तालुक्यात निळवंडे कालव्यांची कामे पोलीस बंदोबस्तात सुरु होणार आहे. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अकोले तालुक्यातील बंदिस्त कालव्यांच्या कामास १ हजार ६५७ कोटीचा खर्च असल्याने तो व्यवहार्य ठरत नसल्याने कालवे उघडेच करावे लागणार आहेत. त्याबाबत शासनाचा २ फेब्रुवारी २०१७ चा आदेश असून त्यानंतर मंजूर नवीन प्रकल्पच बंदिस्त कालव्यांचे होणार आहेत. याखेरीज अकोले तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकर्यांचे सात एकर जागेत पुनर्वसन केले आहे. जमीन सरकारच्या ताब्यात आहे. काम करण्यास कोणाचाही अडथळा नाही मात्र जास्तीचा मोबदला मागणीसाठी काही लोक अडथळा आणतात त्यासाठी पोलीस बळ मिळाल्यास व न्यायालयानेच आदेश दिल्यास आम्ही आठ दिवसांत काम सुरु करतो असे लेखी आश्वासन प्रतिज्ञापत्रत दिले असल्याने लवकरच निळवंडे कालव्यांची कामे सुरु होणार आहे.

Website Title: Nilwande canal will be started in the Police Constituency


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here