Home अकोले निळवंडे धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले

निळवंडे धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले

Nilwande dam was released for agriculture

अकोले | Nilwande Dam: गुरुवारी भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी उन्हाळ्यातील तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता ८२० कुसेकने प्रवरा नदी पात्रात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.

सुमारे २० दिवस हे आवर्तन सुरु राहणार असल्याची माहिती अहमदनगर येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जि.बी.नान्नोर व सहायक अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

या आवर्तनामुळे भंडारदरा धरणाच्या लाभ क्षेत्रातील नागरिकांना लाभ होणार असून शेतातील उभ्या पिकांना जीवदान मिळणार आहे. तसेच नदी काठच्या गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे. यावर्षी भंडारदरा धरणातून खरीप हंगामाचे एक आणि रब्बी हंगामाचे एक असे दोन आवर्तन देण्यात आली आहे. निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते.  

Web Title: Nilwande dam was released for agriculture

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here