Home अहमदनगर शरीरसंबधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वेळोवेळी अत्याचार

शरीरसंबधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वेळोवेळी अत्याचार

Rape Case girl threatening to make body photos viral

बेलापूर | Rape Case: बेलापूर येथील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध करून वेळोवेळी बलात्कार करत मोबाईलमध्ये चित्रित करत व्हायरल करण्याची धमकी देवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याने एका जणांविरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेलापूर येथे राहत असणाऱ्या अल्पवयीन मुलीस रोहित शाम भिंगारदिवे रा. राजवाडा बेलापूर याने प्रेमाचे नाटक करून राहत्या घरी बोलावून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे मोबाईल चित्रित करून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन डिसेंबर २०२० पासून ते आजपर्यंत आरोपीने रहात्या घरी तसेच इतर ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केले.

याप्रकरणी फिर्यादीवरून रोहित भिंगारदिवे याच्याविरुद्ध पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कृष्णा धायवट हे करीत आहे.  

Web Title: Rape Case girl threatening to make body photos viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here