Home अकोले भंडारदरा, मुळा पाणलोटक्षेत्रात पाउसाचा जोर वाढला

भंडारदरा, मुळा पाणलोटक्षेत्रात पाउसाचा जोर वाढला

Rainfall intensified in Bhandardara Mula watershed

अकोले | Bhandardara: जीवनदायी क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे भंडारदरा पाणलोटक्षेत्रात धबधबे सक्रीय झाले आहेत. नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरु होणार आहे.

तसेच मुळा नदीतील विसर्ग वाढल्याने ६०० दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण रात्री निम्मे भरले आहे. अगोदरच आंबित जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे.

या दोन्ही धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने दडी धरली होती मात्र पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतीकामांना वेग आला आहे. धबधबे सक्रीय झाले असून नाले वाहू लागले.

शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)- भंडारदरा १८, घाटघर २१, पांजरे २१, रतनवाडी १८, वाकी १७. शुक्रवारी सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा ५१९८ दलघफू होता. विद्युत गृह क्रमांक १ मधून ८४० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

Web Title: Rainfall intensified in Bhandardara Mula watershed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here