Home महाराष्ट्र Rape Case: अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार, नऊ जणांना अटक  

Rape Case: अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार, नऊ जणांना अटक  

Nine arrested for rape underage girl

कराड | Karad Crime: साताऱ्यातील पाटण येथे अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद पाटण पोलिसात दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पाटण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत माहिती अशी की, पाटण येथील या अल्पवयीन गतीमंद मुलीला आरोपी महिला फिरायला जायचा बहाणा बहाणा करत घेऊन जात होती. त्यानंतर तिची पाटण आणि परिसरातील लोकांशी ओळख करुन देत असे. मग तिला ओळख करुन दिलेल्या व्यक्तींशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. अशा प्रकारे पाटण आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी सदर पीडितेवर वेळोवेळी विविध ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे.  याबाबत मुलीच्या आईला कळल्यावर तिने तात्काळ पाटण पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करीत ९ आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Nine arrested for rape underage girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here